कोरोनामुक्तीच्या जनजागृतीसाठी माजी आमदाराने गायले गाणे: मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार, गाण्याची सोशल मीडियात धूम - जालना उद्धव ठाकरे गाणे
बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी एक गीत रचून स्वतः संगीतबध्द आणि स्वतः गाऊन मुख्यमंत्र्यांचे आभार व्य्क्त केले आहे.
बदनापूर (जालना) - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहेत. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने विचारपूर्वक निर्णय घेत महाराष्ट्राला कोरोनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्याबददल बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी एक गीत रचून स्वतः संगीतबध्द आणि स्वतः गाऊन मुख्यमंत्र्यांचे आभार व्य्क्त केले आहे. हे गीत युटूबवर सध्या प्रचंड लोकप्रिय हेात असून “आम्ही मुख्यमंत्र्यांसमवेत” असल्याची लोकभावना याद्वारे महाराष्ट्रभर होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने व समयसुचकतेने राज्याचे नेतृत्व करत या विषाणूला थोपवून धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिद्दीने व नागरिकांची काळजी घेत वेळोवेळी आवाहन करून तर कधी समजावून सांगत कोरोनाच्या लढ्यात सर्वसामान्य जनतेला सामावून घेतलेले आहे. वेळोवेळी जनतेशी संवाद साधत जनतेला विश्वासात घेऊन कोरोना विरोधातील हा लढा सर्वसमावेशक केला आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करत धडाडीने व धाडसाने निर्णय घेऊन कोराना प्रादूर्भाव रोखण्यास पायबंद केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री करत असलेल्या आवाहनाचे व सूचनांचे पालन सर्वसामान्य जनतेने करावे या हेतूने बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी “मै हु ना” या गीताची रचना केली आहे. स्ंकल्पना, संगीत आणि गायनदेखील स्वतः संतोष सांबरे यांनीच केले आहे. या गीताद्वारे ते कोरोना जनजागृती व प्रबोधन करत आहेत. हे गीत युट्यूबवर https://youtu.be/NNU4O6qgLbw या लिंकवर उपलब्ध आहे.