जालना -भोकरदन शहरामध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टीकरून उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी महेश पुरोहित, सुरेश तळेकर, सतीश बापू रोकडे, नगरसेवक रणवीरसिंह देशमुख यांच्यासह भोकरदन तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
भोकरदन शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी - भोकरदन शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा
यावर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनावर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. भोकरदन शहरामध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टीकरून उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
![भोकरदन शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी equestrian statue](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7501538-32-7501538-1591434698133.jpg)
अश्वारूढ पुतळा
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी
दरम्यान, प्रल्हादपूर येथील सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन आपल्या निवासस्थानीच साजरा केला. जाधव यांनी छत्रपतींच्या राज्याभिषेक प्रतिमेचे आपल्या आईच्या हस्ते पूजनकरून राज्याभिषेक दिन साजरा केला. यावेळी विष्णु गाढे, अनिल खेकाळे, भाऊसाहेब शेळके, सोमीनाथ नामदे, योगेश बरडे हे उपस्थित होते.