महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण; सोशल डिस्टन्सिंग पाळत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा - ध्वजारोहण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Health Minister Rajesh Tope
आरोग्य मंत्री राजेश टोपे

By

Published : May 1, 2020, 9:54 AM IST

Updated : May 1, 2020, 10:35 AM IST

जालना - यावर्षीच्या महाराष्ट्र दिनावर कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोना प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे जिल्ह्यात अन्य कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी देखील सामाजिक आंतर पाळत मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.

Last Updated : May 1, 2020, 10:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details