महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदनापुरात टिप्परने पाच वर्षीय बालकाला चिरडले - बदनापूर अपघात बातमी

स्त्याने जाणाऱ्या भरधाव हायवा (टिप्पर, एमएच 21 बीएच 9639) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने श्रेयस चिरडला गेला. या अपघातात श्रेयसचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नितीन ढिलपे व इतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन टिप्पर बदनापूर पोलीस ठाण्यात आणले तर मृत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

five year old boy was crushed by tipper at badnapur in jalana
बदनापुरात टिप्परने पाच वर्षीय बालकाला चिरडले

By

Published : Oct 6, 2020, 9:07 PM IST

बदनापूर (जालना) -तालुक्यातील चिखली या गावात पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर खडी वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने (१० चाकी ट्रक) रस्त्याच्या कडेला बसलेल्या 5 वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना घडली. यावेळी या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. श्रेयस विलास रेगुडे (वय ५) असे मुलाचे नाव आहे.

राजूर ते दाभाडी रस्त्यावरील चिखली येथे हा अपघात झाला. चिखली(दाभाडी) या गावातील श्रेयस विलास रेगुडे (वय पाच) हा मुलगा पशु वैद्यकीय दवाखानाजवळ रस्त्याच्या कडेला बसलेला होता. या रस्त्याने जाणाऱ्या भरधाव हायवा (टिप्पर, एमएच 21 बीएच 9639) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने श्रेयस चिरडला गेला. या अपघातात श्रेयसचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नितीन ढिलपे व इतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन टिप्पर बदनापूर पोलीस ठाण्यात आणले तर मृत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details