जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आज पाच रुग्णांची भर होऊन ही संख्या आता 41 वर पोहोचली आहे. यातील चार रुग्ण जालना शहरातील मंठा चौफुली भागात असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आहेत. यापूर्वी याच हॉस्पिटलमधील डॉक्टरला आणि त्याच्या सहकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती.
जालन्यात आढळले कोरोनाचे पाच नवे रुग्ण, बाधितांची संख्या 41 वर - जालन्यातील कोरोना रुग्णांची संख्या
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील चार आणि अंबड तालुक्यातील शीरनेर येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 41 वर गेला आहे. त्यामुळे, आता जालनाकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जालन्यात आढळले कोरोनाचे पाच नवे रुग्ण
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील चार आणि अंबड तालुक्यातील शीरनेर येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 41 वर गेला आहे. त्यामुळे, आता जालनाकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 34 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.