जालना-मोटारीमध्ये गाय, वासरांना घालून चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच परतूर शहरातून आज (दि. 9) दोन क्विंटल गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
गाई चोरी जाण्याचे वाढले होते प्रमाण
जालना शहरासह जिल्ह्यांमधून जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. विशेष करून गाय-वासरांची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत होते. त्यातच परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आणि ठाकरे या दोघांना परतूर शहरात गोमांस विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अंभोरे यांनी आपल्या सहकार्यांसह कुरेशी मस्जिद जवळील चिंचेच्या झाडाखाली सुरुूअसलेल्या मांस विक्रीच्या दुकानांवर छापा टाकला. या छाप्यात 5 गोमांस विक्रेते पोलिसांच्या हाती लागले. तर काही जण फरार होण्यात यशस्वी झाले. छाप्यात सापडलेल्या पाच जणांकडून पोलिसांनी दोन क्विंटल गोमांस जप्त केले आहे.
हे आहेत आरोपी
गोमांस विक्री करताना सापडलेल्या कसायांमध्ये फिरोज मस्तान कुरेशी, शाहिद अब्दुल्ला कुरेशी, याकोब नादान कुरेशी, शाबाद आरिफ कुरेशी, आसलम अब्दुल रहिम कुरेशी यांचा समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली. भां.द.वि.च्या कलम 5 (ब) क, 9 व 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.