जालना - शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ (Corona Cases Hike in Jalna) होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रविवारी (9 जानेवारी) जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron in Jalna) आढळून आला आहे. हा व्यक्ती दुबईमधून जालन्यात परतला होता.
दुबई येथून जालन्यात १ जानेवारी रोजी परतलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. सदर अहवाल रविवारी ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.