महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

न्युमोनियाचा उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा कोरोनामुळे जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे.

COVID HOSPITAL
कोव्हिड रुग्णालय

By

Published : May 31, 2020, 12:08 PM IST

Updated : May 31, 2020, 12:36 PM IST

जालना - जिल्ह्यामध्ये कोरोनाची 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सुदैवाने एकही बळी गेला नव्हता, मात्र शनिवारी (दि.30 मे) परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 45 वर्षीय एका व्यक्तीला न्युमोनियाचा आजार झाल्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल आज (दि. 31 मे) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.

माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड

जिल्ह्यात कोरोनामुळे हा पहिला मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा मुंबई येथून आपल्या मुळगावी परतला होता. त्याची परिस्थिती गंभीर होती. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. त्याचे कुटुंबीय घरीच विलगीकरण झाले आहेत. त्यामुळे ते अंत्यविधीस उपस्थित राहू शकणार नाहीत.

दरम्यान, आज (दि. 31 मे) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून त्यामध्ये मृत व्यक्तीचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना आकडा आता 126 वर पोहोचला आहे.

हेही वाचा -दिलासादायक..! जालन्यात एकाच दिवशी १२ रुग्ण कोरोनामुक्त

Last Updated : May 31, 2020, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details