जालना - तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाला आग लागल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. आज पहाटे 4 वाजता संबंधित घटना घडली असून कोषागार कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या कार्यालयात मागील १५ वर्षांचे नुवडणुकांचे रेकॉर्ड्स होते.
बदनापूर निवडणूक विभागाला आग; १५ वर्षांचे निवडणूक रेकॉर्ड जळून खाक - जालना आग
तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाला आग लागल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण कार्यालाय जळून खाक झाले आहे. आज पहाटे 4 वाजता संबंधित घटना घडली असून कोषागार कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
बदनापूर तालुक्यात 25 जून रोजी पहाटे 3 वाजता अचानक विजेच्या कडकडाट सह मुसळधार पाऊसास सुरवात झाली. तर दुसरीकडे बदनापूर तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक विभाग खोलीतून अचानक धूर निघू लागल्याचे कोषागार कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यास निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्याने त्या दिशेने धाव घेतली. यानंतर आग भडकल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्याने तत्काळ तहसीलदार छाया पवार यांच्यासह अग्निशमन दलाला माहिती दिली.
बदनापूर तहसील कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार संजय शिंदे, तलाठी सुनील होळकर यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. काही मिनिटांत आग आटोक्यात आली. मात्र या विभागातील मागील 15 वर्षांचे विधानसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.