जालना - घातक शस्त्र बाळगून नागरिकांत दहशत निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी तलवार व चाकूसह ताब्यात घेतले आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही कारवाई करण्यात आली असून समाधान दत्तात्रेय कांबळे (वय २२), असे या तरुणाचे नाव आहे.
तरुणाला तलवार, चाकू घेऊन फिरणे पडले महाग, गुन्हा दाखल - बदनापूर जालना क्राईम
समाधान हा तरुण दाभाडी व आजूबाजूच्या परिसरात तलवार व चाकू, अशी घातक शस्त्रे घेऊन फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांना मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

समाधान हा तरुण दाभाडी व आजूबाजूच्या परिसरात तलवार व चाकू, अशी घातक शस्त्रे घेऊन फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांना मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. त्या तरुणाची चौकशी केली असता त्याच्याजवळ एक मोठी तलवार आणि एक चाकू आढळून आला. पोलिसांनी शस्त्रासह त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे करीत आहेत.