जालना - पोलीस ठाणे भोकरदन हद्दीतील सिरसगाव मंडप शिवारात एक व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्री करत होता. देशभर संचारबंदी लागू असातानाही दारू विक्री केल्यामुळे पोलिसांनी दोन दारू विक्रेत्यांच्या गुत्त्यावर छापा टाकून, 172 दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा 12 हजार 700 रुपयांचा माल जप्त केला आहे.
जालन्यामध्ये संचारबंदीच्या काळातही दारू विक्री; दोघांवर गुन्हा दाखल
राजू आप्पाराव सहाणे (रा. सिरसगाव मंडप) आणि जानू हरिदास जाधव (रा. सावखेडा) हे दोघे अवैध देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये भोकरदन यांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दुपारी गुरुवारी दुपारी हसनाबाद ते भोकरदन रस्त्यावरील हॉटेल राजच्या पाठीमागे छापा टाकला.

दोघा आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ही पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर सिनकर, गणेश पायघन, जगदीस बावणे, सागर देवकर, एकनाथ वाघ यांनी केली आहे.