जालना -बदनापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकावर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी औरंगाबाद लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. रंजना वाल्मीक पाटील (वय 32, रा. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल - बदनापूर लाच प्रकरण
तक्रारदाराच्या भावाविरुध्द दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना आरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने थेट औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागात लेखी तक्रार केली. तडजोडीनंतर आरोपीने 40 हजार रुपयांची मागणी केल्याचे तपासात आढळून आले आहे.
हेही वाचा -बिल ऑनलाईन देण्यासाठी लाच; धान खरेदी केंद्राच्या अध्यक्षासह संगणकचालक एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदाराच्या भावाविरुध्द दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना आरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने थेट औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागात लेखी तक्रार केली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उप-अधीक्षक रुपचंद वाघमारे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तडजोडीनंतर आरोपीने 40 हजार रुपयांची मागणी केल्याचे तपासात आढळून आले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटीलविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सहा. अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रूपचंद वाघमारे, निरीक्षक गणेश धोक्रट, गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, मिलिंद इपर, पुष्पा दराडे यांनी ही कारवाई केली.