जालना- शेतकऱ्याच्या मुलाने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कल्याण आसाराम काळदाते असे त्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. कल्याणची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. तो परतूर तालुक्यातील आंबा येथील रहिवासी आहे.
अभिमानास्पद; शेतकऱ्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार - शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार
कल्याण आसाराम काळदाते या शेतकऱ्याच्या मुलाने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कल्याण हा सर्वसामान्य घरातील असून त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. कल्याणचे प्राथमिक शिक्षण आंब्याच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले.
कल्याण काळदाते हा सर्वसामान्य घरातील असून त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. कल्याणचे प्राथमिक शिक्षण आंब्याच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले. नंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्याची निवड वाल्मिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा येथे झाली. तिथे त्याने कॅम्प्यूटर सायन्सची पदवी मिळविली. त्यानंतर एक वर्षासाठी त्याने टीसीएस कंपनीमध्ये काम केले. हे काम करत असताना समाजाविषयी असणारी धडपड त्याला शांत बसू देत नव्हती. म्हणून त्याने हे काम सोडले आणि राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी लागला.
कल्याणने 2017 आणि 2018 मध्ये त्याने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा पास केल्या. मुख्य परीक्षेसाठीही तो पात्र झाला. पण त्याला मुख्य परिक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे माघार घ्यावी लागली. पुढे त्याने कठोर मेहनत करून 2019-20 मध्ये परीक्षा दिली आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. नायब तहसीलदारपदी कल्याणची निवड झाल्यामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे.