महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी कायद्याला शेतकरी संघटनेचा पाठिंबा, विविध संघटनांमध्ये फूट - Shard joshi news

कृषी कायद्यावर शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. शरद जोशीप्रणित संघटनेने या कायद्याचे स्वागत केले तर, काही संघटना याला विरोध करत आहेत.

शेतकरी संघटनेचे पाठिंबा
शेतकरी संघटनेचे पाठिंबा

By

Published : Oct 2, 2020, 5:20 PM IST

जालना - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांनी गांधीचमन परिसरात या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या बाजूने घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. याचवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्यासंदर्भात निषेधाची भाषणे चालू होती.

कृषिमाला संदर्भात केंद्र सरकारने तीन विधेयके मंजूर केली आहेत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र काही लोक शेतकऱ्यांना भडकावून या कायद्याचा विपर्यास करीत आहेत. अभ्यास न करताच अफवा पसरवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खरेतर शेतकरी संघटनेची हीक मागणी होती आणि शेतकरी संघटनेचा या कायद्याला पाठिंबा आहे.

गांधीचमन परिसरात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ .आप्पासाहेब कदम, गजानन भांडवले, प्रा. नारायणराव बोराडे, बाबुराव गोल्डे, विश्वंभर भानुसे, भास्कर धुमाळ ,नरेश वाडेकर, रमेश खांडेभराड आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details