जालना- अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच भोकरदनमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मजुरांच्या घरी जाऊन कापूस वेचणीला येण्याची विनवणी करावी लागत आहे.
मागील काही दिवसांत परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचले होते. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी हे पिके सांगून ठेवली होती. ती पावसाच्या पाण्यात भिजली. त्याला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.