जालना - केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. फवारणासाठी कीटकनाशकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या कीटकनाशकांवर बंदी आली, तर उत्पादन घटेल फक्त सेंद्रिय शेती केल्यास हवे तेवढे उत्पादन होणार नाही, असे शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान उपनेते लक्ष्मण वडले यांनी दिली. सरकारने कीटकनाशकांवर बंदी आणण्यापेक्षा याला पर्याय म्हणून ज्या शेती उत्पादनाला कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज नाही अशा बीटी बियाण्यांचा शोध लावा, अशी अपेक्षाही वडले यांनी व्यक्त केली.
कीटकनाशकांवर बंदी आणल्यास उत्पादन घटेल - लक्ष्मण वडले
शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या चार-पाच दिवसात पेरणीला सुरुवात होईल आणि महिन्याभरानंतर शेतकऱ्यांना विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी कीटकनाशकांची गरज भासणार आहे. अशा महत्त्वाच्या वेळी केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.
शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले
दरम्यान, केंद्र सरकार बंदी आणत असलेल्या कीटकनाशकांची यादी बहुतांश शेतकरी आणि औषध विक्रेत्यांना माहीतच नाही. त्यामुळे कोणत्या औषधांचा पिकांना चांगला फायदा होत होता आणि कोणते औषध शरीरास अपायकारक आहे, हेच अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयासंदर्भात विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
Last Updated : Jun 1, 2020, 6:00 PM IST