जालना- वीज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या अडचणीचा समोरे जावे लागत आहे. यासाठी संबंधित वीज विभागातील काही लोक मनमानी करत असल्याचा आरोप भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील शेतकऱ्यांनी केला. वेळीच संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'तीन चाकाचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, सरकारमधील आमदारच यांना घरी पाठवतील'
दर तिसऱ्या दिवशी थ्री फेज वीज पुरवठा केला जातो. मात्र, काही क्षणात परत वीज पुरवठा खंडीत होतो. विषेश म्हणजे हिसोडा गावाचा सब स्टेशन अन्वा आहे. येथील काही लोक मनमानी करून अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच लाईनमॅन सुद्धा दिशाभूल करत आहे. वीजेसाठी फोन लावला तर ते फोन सुद्धा घेत नाही. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी, असा संताप शेतकऱ्यांनी वक्त केला. तसेच प्रश्न सुटला नाही, तर वीज वितरण कंपनी विरूद्ध लोकशाही मार्गाने आनंदोल पुकारण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
हेही वाचा - 'तीन चाकाचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, सरकारमधील आमदारच यांना घरी पाठवतील'