जालना -लांडग्याने पिंपळगाव कोलते शेत-शिवारात शेतकरी आणि शेतमजूरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. कौतिक सोळंके, मंजरा मुरमुर असे हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
जालन्यात लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी, मजूर जखमी - Farmer injured in wolf attack
जालन्याती पिंपळगाव कोलते शेत-शिवारात लांडग्याने पिंपळगाव कोलते शेत-शिवारात शेतकरी आणि शेतमजूरावर हल्ला केला. या हल्ल्यातील जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.
जालन्यात लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी, मजूर जखमी
हेही वाचा - अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; आरोपीला पकडण्यात पोलिसांची टाळाटाळ
लांडग्याच्या हल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना पिंपळगाव कोलते शेत-शिवारात घडली आहे. लांडग्याने सकाळी गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. यानंतर टॉवर काम करण्यासाठी आलेल्या बिहारी मजुरांवर सुद्धा लांडग्याने हल्ला केला.