जालना - बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. परमेश्वर पंढरीनाथ नरवडे (वय 45), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परमेश्वर यांच्यावर बँकेचे कर्ज होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्ज फेडण्याच्या विवंचनेत होते.
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील घटना - परमेश्वर पंढरीनाथ नरवडे आत्महत्या
परमेश्वर यांची वाल्हा येथे चार एकर शेती आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने त्यांचे उत्पन्न घटतच चालले होते. शेतीसाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधून कर्ज घेतले होते. त्यातच यंदा त्यांच्या मुलीचा विवाह पार पाडला. त्यासाठीही त्यांनी काही उसनवारी घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते कर्ज फेडण्याच्या विवंचनेत होते.
हेही वाचा -धक्कादायक..! धावत्या रेल्वे समोर उडी मारून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
परमेश्वर यांची वाल्हा येथे चार एकर शेती आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने त्यांचे उत्पन्न घटतच चालले होते. शेतीसाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधून कर्ज घेतले होते. त्यातच यंदा त्यांचा मुलीचा विवाह पार पाडला. त्यासाठीही त्यांनी काही उसनवारी घेतली होती. यावर्षीदेखील पाहिजे तसे उत्पन्न न झाल्याने ते कर्ज चुकवण्याच्या चिंतेत होते. आज सकाळी 10च्या सुमारास गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, पत्नी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.