जालना -सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. चुलत बहिणीच्या हळदीच्या दिवशी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
नापिकीमुळे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. चुलत बहिणीच्या हळदीच्या दिवशी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
भगवान शंकरराव पाबळे (वय, 30) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. काही वर्षापासून शेतात उत्पन्न होत नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढला होता. तसेच लॉकडाऊन असल्याने हाताला दुसरे काम नाही. या विवेंचनेतून भगवानने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मंगळवारी रात्री चुलत बहिणीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान भगवान रात्री शेतात गेला. शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची नागरिकांना माहिती मिळताच शेतात गेले आणि भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.