जालना -विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातल्या फत्तेपूरमध्ये घडली आहे. सुरेश मधुकर सोनुने वय 32 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Jalna District Latest News
विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातल्या फत्तेपूरमध्ये घडली आहे. सुरेश मधुकर सोनुने वय 32 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
भोकरदन तालुक्यातल्या फत्तेपूरमधील रहिवासी असलेला सुरेश हा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी विद्युत पंप सुरू करताना त्याला विजेचा धक्का लागला, आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात दिला. बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.