महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालखेडा शिवारात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या - Bhokardan Police Station Farmer Suicide

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी काकडे यांनी मालखेडा शिवरात स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

jalna
शिवाजी देवराव काकडे

By

Published : Dec 15, 2019, 8:32 AM IST

जालना- शेतात गळफास घेऊन एका कर्जबाजारी शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील सिल्लोड रोडवरील मालखेडा शिवारात शनिवारी घडली. शिवाजी देवराव काकडे (वय.५२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी काकडे यांनी मालखेडा शिवरात स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत भोकरदन पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस ठाण्याचे अधिकारी एल.व्ही चौधरी यांनी नागरीकांच्या मदतीने शिवाजी काकडे यांच्या देहास शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी शिवाजी काकडे यांना मृत घोषित केले. सदर घटनेचा पंचनामा करून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी एल.व्ही चौधरी करीत आहे.

हेही वाचा-जालन्यात ध्वजनिधी संकलनाचे उल्लेखनीय कार्य, दीडशे टक्के निधीचे संकलन

ABOUT THE AUTHOR

...view details