महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suicide News : हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या

बाजीउमृद येथील राजू धर्म राठोड या शेतमजुरानी घरच्या हलाकीच्या परिस्थितीला व मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी जास्त प्रमाणात येणाऱ्या खर्चाला कंटाळून आत्महत्या ( Farm laborer commits suicide ) केली. जीवन संपवले

Farm laborer commits suicide
शेतमजुराची आत्महत्या

By

Published : Nov 9, 2022, 12:40 PM IST

जालना : तालुक्यातील बाजीउमृद येथील शेतमजूर राजु धर्म राठोड वर्ष ३५ ह्यांने वडगाव येथील शेतमालकाच्या शेतामध्ये विष प्राशन पिऊन आत्महत्या ( Farm laborer commits suicide ) केली आहे. ही घटना दिनांक ६ नोव्हेंबरला दुपारी ४.०० वाजता घडली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे राजु राठोड यांचा एक मुलगा सुमीत वय वर्ष १० सुमीत मागील बऱ्याच दिवसापासून आजारी होता. त्याचे वैद्यकीय उपचारासाठी दिवसेंदिवस खर्चाचे प्रमाण वाढले (Expenditure increased ) होते. तेव्हा त्यांनी जालना येथील सुसृशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते.

शेतमालकाच्या शेतामध्ये विष प्राशन करून संपवले जीवन : डॉक्टरांनी त्या मुलाचे एक्सरे व एम.आर.आय करून, डोक्यात गाठ आहे व पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात यावे अशा सूचना केल्या होत्या. परंतु घरची परिस्थिती नाजूक व हलाखीची असल्याने त्यांनी शेतमालकाच्या शेतामध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी विष पिऊन करून आत्महत्या केल्याचे रिपोर्ट दिले आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गावी बाजीऊमृद तांडा येथे आणण्यात आले. दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

परिसरामध्ये हळहळ व्यक्त : या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या पाश्चात एक मुलगा, एक मुलगी व पत्नी, आई वडिलांचा असा परिवार आहे. अशी माहिती बाजीऊमृद येथील सरपंच संजय राठोड व उपसरपंच विष्णू राठोड, शिवाजी राठोड, दत्तू चव्हाण, त्रिंबक पवार, श्याम पवार,रमेश पवार,प्रकाश पवार,लहू राठोड,लहू चव्हाण,आकाश राठोड,गोविंद राठोड,सावजी राठोड, दिनकर राठोड, राहुल राठोड, प्रेम राठोड यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details