जालना - तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरु असतानाच या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा येथील टिप्पर चालक घेत होते. टिप्पर चालक मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर या महामार्गासाठी करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करुन येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद - महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद
तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम जोरात सुरू असतानाच या कामात कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. याचा फायदा येथील टिप्पर चालक घेत होते. टिप्पर चालक मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर या महामार्गासाठी करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ प्रशासनाने दखल घेऊन या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करुन येथील नमुने घेऊन हे मातीचे टिप्पर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर ते मुंबई हे अंतर 10 ते 12 तासात पूर्ण व्हावे. तसेच या मार्गामुळे दळण-वळण वाढून विदर्भाच्या प्रगतीला वेग यावा, या उद्देशाने तयार होत असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सर्वत्र सुरू आहे. मोठे कंत्राट असल्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या एजन्सीमार्फत या महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. नुकतेच महाआघाडीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. सरकारने या कामासाठी मोठा निधी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. बदनापूर तालुक्यात जिथपर्यंत हा महामार्ग बनत आहे, त्या रस्त्याच्या कामात मात्र मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली आहे.
आज मंगळवारी अधीक्षक अभियंता जाधव विक्रम, कार्यकारी अभियंता आर. टी. खलसे, ॲथोरिटी अभियंता फारुक सय्यद यांनी सह-अभियंता मोरे यांच्यासह थेट ज्या ठिकाणी ही माती पसरवण्यात येत होती तेथे जाऊन तेथील सॅम्पल (नमुने) घेऊन पाहणी केली. हे नमुने जरी व्यवस्थित आढळून आले तरीही ठेकेदारांना ताबडतोब ही माती टाकणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईटीव्ही भारतमध्ये आलेल्या वृत्तामुळे मातीचा वापर थांबण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.