जालना - कन्हैया नगर परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण जालना पूर्व या कार्यालयातूनवणीकरणाची कामे केली जातात. रोपवाटिकेचे काम करणाऱ्या गुत्तेदार आणि कामगार महिलांना लाखो रुपयांचे धनादेश दिले होते. दोन कंत्राटदार अधिकृत आहेत. मात्र, तीनशे रुपये रोजाने काम करणाऱ्या महिलांच्या खात्यावर सामाजिक वनीकरणाने लाखो रुपये जमा केले आहेत. या मजुरांच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम थेट कोणत्या कारणासाठी जमा केली आणि ती संबंधितांनी काढली आहे. मात्र, यांच्या खात्यातून आयडीबीआय बँकेच्या शाखेमधून रक्कम परस्पर काढून घेतली असल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक 14 ऑगस्ट 2019 ला दिली होती.
वर्षभरानंतर सामाजिक वनीकरण विभागातील प्रकरणाची चौकशी सुरू - जालना वनविभाग घोटाळा बातमी
या खातेदारांच्या खात्यामधून जुलैमधून लाखो रुपयांच्या रक्कमा धनादेशाद्वारे काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर 18 ऑगस्टला ही तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर कुठलाही पाठपुरावा संबंधितांनी न केल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून आता याचा तपास सुरू केला आहे.
सुमारे साडेचौदा लाख रुपयांची रक्कम खात्यावरून गायब झाल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दादाराव देवराव जाधव, तोसिफ दिलावरखान. हे दोन कॉन्ट्रॅक्टर तर राधाबाई सर्जेराव खमाटे ,भागुबाई संतोष बचाटे, आणि भाग्यश्री काशिनाथ सोरमारे या तिन्ही महिला हे रोपवाटिकेत काम करतात. या प्रकरणात आता वर्षभरानंतर पोलिसांनी लक्ष घातले असून तपास सुरू केला आहे.
या खातेदारांच्या खात्यामधून जुलैमधून लाखो रुपयांच्या रक्कमा धनादेशाद्वारे काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर 18 ऑगस्टला ही तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर कुठलाही पाठपुरावा संबंधितांनी न केल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून आता याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात वनविभागाचे विभागीयअधिकारी व्ही. पी. जगत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही संबंधित विभागाला निधी दिलेला आहे. तो कसा वितरित करायचा हे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण जालना पूर्वच्या अधिकारी वृषाली तांबे या ठरवतात .त्यामुळे या याविषयी त्याच माहिती देऊ शकतील.
वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण जालना पूर्वच्या अधिकाऱ्यांनी देखील माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पुन्हा विभागीय वनाधिकारी व्ही.पी. जगत यांच्या कार्यालयाशी आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला माहिती देतो देतो म्हणत त्यांनी शेवटी माहिती देणे टाळले. कारण ज्या मजुरांच्या नावावर लाखो रुपये धनादेश दिले गेले आहेत हे धनादेश कोणत्या कामा बाबतीत दिल्या गेले आणि वैयक्तिक मजुरांना कसे दिले गेले ?या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत.