महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फायदा घेत जालन्यात महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणे सहज हटवली

जालना शहरात मध्यवस्तीत नगरपालिकेच्या मालकीची महात्मा ज्योतिबा फुले ही मोठी बाजार पेठ होती. बारा वर्षांपूर्वी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी हे मार्केट पाडण्याचे ठरवले आणि इमारत अर्धवट पाडून ठेवली. त्यामुळे या इमारतीच्या जागेवर फळवावाल्यांनी हातगाड्या लावून अतिक्रमण केले होते.

Encroachment removed from mahatam phule market in Jalna
जालन्यात फुले मार्केटमधील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवली

By

Published : Jun 12, 2020, 10:34 PM IST

जालना - शहरात मध्यवस्तीत नगरपालिकेच्या मालकीची महात्मा ज्योतिबा फुले ही मोठी बाजार पेठ होती. मात्र, मागील बारा वर्षांपूर्वी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी हे मार्केट पाडण्याचे ठरवले आणि इमारत अर्धवट पाडून ठेवली. त्यामुळे या इमारतीच्या जागेवर फळवावाल्यांनी हातगाड्या लावून अतिक्रमण केले. पर्यायाने पालिकेचे उत्पन्न बुडाले.

सदर ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. मात्र, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन राजकीय कुरघोडीपुढे हतबल झाले होते. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दी रोडावल्याचे लक्षात घेता, ही अतिक्रमणे हटवण्यात आली. तसेच येथे आता पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले आहे.

जालन्यात फुले मार्केटमधील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवली...

हेही वाचा...कोरोना काळात मंत्र्यांमध्ये भांडणे सुरू; राज्य सरकारने बंद करावा हा तमाशा - आमदार लोणीकर

बारा वर्षांपूर्वी जालना शहरात दोन मोठे खासगी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झाले. तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी नगरपालिकेच्या मालकीची असलेली दोन मजली इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत जमीनदोस्त केली. तिथे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर केला. मुळात हा प्रस्ताव एक बनाव असल्याचे पुढे लक्षात आले आणि या ठिकाणी एक वीट देखील रचली गेली नाही. त्यामुळे नगरपालिकेचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यासोबतच परिसरातील व्यापाऱ्यांना आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.

बाजारात आलेल्या ग्राहकांनी आपली वाहने लावायची कुठे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याचे कारण ज्या ठिकाणी वाहने लावायची, त्या ठिकाणी फळांची गाडे, चपलांची दुकाने अशा प्रकारची दुकाने लावून अतिक्रमण केले होते. त्यामुळे दररोज भांडणे होत होती. या प्रकाराला शहर वाहतूक शाखा देखील प्रचंड वैतागली होती. सकाळी हाकलून दिलेली हातगाडी पोलिसांची जीप पुढे सरकत नाही, तर लगेच पुन्हा तिथे येत असत.

हेही वाचा...#IFLOWS-MUMBAI : 'पूर इशारा प्रणाली मुंबईला वरदान ठरणार आहे'

त्यामुळे सर्वजण वैतागले होते. अखेर आज (शुक्रवार) जालना नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने ही सर्व अतिक्रमणे हटवली आहेत. नगरपालिकेच्या 70 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे हटवण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, अतिक्रमण धारकांनी त्यांच्या चीजवस्तू स्वतःहून उचलून न नेल्यास उद्या नगरपालिका उचलून नेणार आहे. अथवा जप्त करणार असल्याचेही मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details