जालना - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. हा दिवस सर्वत्र सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सद्भावना शपथ देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली.
जालन्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना दिनाची शपथ - माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सर्वत्र 'सद्भावना दिवस' म्हणून साजरी केली जाते. या निमित्त जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सद्भावना शपथ देण्यात आली.

जालन्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना दिनाची शपथ
जालन्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना दिनाची शपथ
ही आहे सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा
'मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार-विनिमय करून व संविधानीक मार्गाने सोडवेल.'