जालना - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील 779 ग्रामपंचायतींपैकी 475 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पुढील एक महिना आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
कोरोनामुळे लांबल्या होत्या निवडणुका-
एप्रिल 2020 ते जून 2020 मध्ये या विविध ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला होता. मात्र कोरोनामुळे 17 मार्च 2020 च्या आदेशान्वये या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. दिनांक 1 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक सात पर्यंत हरकती घेण्यात आल्या होत्या. दिनांक नऊ डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी आता दिनांक 14 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तालुका निहाय ग्रामपंचायत-
जालना तालुका- 86
बदनापूर- 60
भोकरदन- 91
जाफराबाद- 17
परतुर- 38
मंठा- 50
अंबड- 71
घनसावंगी- 62
अशा एकूण 475 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम-
- तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 15 डिसेंबर 2020
- नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक बुधवार दिनांक 23 डिसेंबर ते ते 30 डिसेंबर पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
- नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक 31 डिसेंबर अकरा वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
- नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक 4 जानेवारी 2021 पासून दुपारी तीन वाजेपर्यंत
- निवडणूक चिन्ह नेमून देण्याच्या आणि निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची करण्याचा दिनांक 4 जानेवारी 2021 दुपारी तीन वाजेनंतर
- प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक दिनांक 15 जानेवारी 2021
- मतमोजणीचा दिनांक 18 जानेवारी
- निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 21 जानेवारी 2021
याप्रमाणे हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा-जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू; सरपंचासाठी आरक्षण सोडत
हेही वाचा-कोरोना लसीकरणासाठी महापालिकेची 'ब्ल्यू प्रिंट' तयार, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार लस