जालना -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 'प्रतिभा संगम' हे 18 वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन उद्या (1 फेब्रुवारी) पासून शहरात सुरू होत आहे. तत्पूर्वी आज सकाळी अभाविपतर्फे गांधी चमन येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.
उद्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अठरावे राज्यस्तरीय संमेलन - ABVP
जेईएस महाविद्यालयासमोर असलेल्या अग्रेशन फाऊंडेशन येथे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी'मध्ये हे संमेलन सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी अभाविपतर्फे गांधी चमन येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.
ग्रंथ दिंडी
जेईएस महाविद्यालयासमोर असलेल्या अग्रेशन फाऊंडेशन येथे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी'मध्ये हे संमेलन सुरू होणार आहे. आज पार पडलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन उद्योजक समीर अग्रवाल व नगराध्यक्ष सौ .संगीता गोरंट्याल यांच्यासह या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचे निमंत्रक प्रा. सुनील कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदींच्या उपस्थितीत पार पडले. झाले. या ग्रंथ दिंडीत पालखीमध्ये भारताचे संविधान, श्रीमद भगवद्गीता, दासबोध आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते.