जालना - किराणा दुकानातून सामान घेऊन लक्ष्मीकांत नगरकडे दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन महिलांना मालवाहू आयशर टेम्पोने उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अर्चना वाळके असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिपाली कव्हाळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आयशर टेम्पोची दुचाकीस्वार दोन महिलांना धडक.. एकीचा मृत्यू एक गंभीर, दुचाकीही जळाली - जालना अपघात
किराणा दुकानातून सामान घेऊन लक्ष्मीकांत नगरकडे दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन महिलांना मालवाहू आयशर टेम्पोने उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जालना-अंबड मुख्य रस्त्यावर हा अपघात झाल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
jalna accident
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या दोन महिला ईनदेवाडी येथील एका किराणा दुकानातून सामान घेऊन अंबड रोडकडे असलेल्या लक्ष्मीकांत नगर येथे जात होत्या. दरम्यानच्या काळात पाठीमागून आलेल्या आयशर ने यांना जोरदार धडक दिली. जालना-अंबड मुख्य रस्त्यावर हा अपघात झाल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.
हे ही वाचा - निकिता तोमर हत्याकांड : दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा