जालना - जालना ते परभणी या महामार्गावर रस्त्यालगत वसलेल्या या एदलापूर गावाने खऱ्या अर्थाने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या सहकार्याने जगण्याची कला अवगत केली आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार ८१३ जण राहणाऱ्या गावात १८० उंबरठे आहेत. त्यापैकी १५८ घराच्या समोर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नातून इयर टायरच्या माध्यमातून ६९ शौचालयाचे बांधकाम करून दिले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग; 'जगण्याची कला' शिकलेले एदलापूर गाव
जालना ते परभणी या महामार्गावर रस्त्यालगत वसलेल्या या एदलापूर गावाने खऱ्या अर्थाने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या सहकार्याने जगण्याची कला अवगत केली आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार ८१३ जण राहणाऱ्या गावात १८० उंबरठे आहेत.
गावात उच्च प्रतीचे साहित्य, नळ, लाईट एवढेच नव्हे तर पाणी साठविण्यासाठी जलकुंभाची ही व्यवस्था करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या अन्य २ योजनांमधून ५९ आणि घरगुती मालकी ३०, श्री. श्री. रविशंकर ६९ असे एकूण १५८ स्वच्छालये बांधून दिली आहेत. याचा वापरही केला जात आहे. जिल्ह्याला स्वच्छतेचा पहिला पुरस्कारही मिळालेला आहे. असे असतानाही बऱ्याच गावात अजूनही प्रवेश करताना नाक बंद करूनच जावे लागते. शासनाने स्वच्छतेसाठी विविध योजना आणल्या आहेत. मात्र, शासनाच्या या चांगल्या योजनादेखील फसव्या ठरतात. जगण्यासाठी जगण्याची 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिकविणाऱ्या संस्थेने फक्त स्वच्छालय बांधून दिली नाहीत तर, त्यांचा परिपूर्ण वापर व्हावा म्हणून जनजागृतीही केली आहे. गावकऱ्यांच्या असलेल्या विविध सवयींबद्दल जनजागृती करून त्यांना त्या सवयींपासून परावृत्त केले. म्हणूनच या गावाला स्वच्छालय वापरायची सवय लागली.
गावचे सरपंच गोपाळ जनार्धनराव मरळ यांनी देखील आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत जोडून गावाचा कायापालट केला. सध्या गावामध्ये, पहिली ते पाचवीपर्यंत ३ शिक्षकी शाळा असून ७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेने सांगितले. तत्कालीन ग्रामसेवक पी. आर. गजभारे यांनी देखील या गावच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.
एदलापूर समोरील जालना-परभणी हा मुख्य रस्ता ओलांडल्यानंतर समोरच भव्य प्रांगणामध्ये श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने डॉ. प्रा. वायाळ यांनी ज्ञान मंदिर उभे केले आहे. त्या ज्ञानमंदिराचा प्रकाश या एदलापूर गावावर पडला आणि गावकऱ्यांचे जीवनमानच बदलून गेले. व्यसनमुक्तीचा हा उपक्रम राबविला गेल्यामुळे गावामध्ये, दारू, तंबाखू, अशा प्रकारची व्यसने बंद झाली असून, गाव सुजलाम सुफलाम होत आहे.