जालना -शिवसेनेचे नेत अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील कार्यालय आणि घरावर आज (26 नोव्हेंबर) ईडीने छापे टाकले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमैया (BJP Leader Kirit Somaiya) यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Shiv Sena Leader Arjun Khotkar) यांच्यावर रामनगर साखर कारखाना खरेदी तसेच कारखान्यांच्या जमिनीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर आज जालन्यात ईडी(ED)चे पथक दाखल झाले होते.
- कागदपत्रांची केली तपासणी
जालन्यात ईडीचे पथक आज सकाळी दाखल झाले होते. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आज ईडीच्या पथकाने अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना बाजार समितीच्या कार्यालयात प्रथम जाऊन चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या पथकाने बाजार समितीच्या सचिवांना सोबत घेऊन शहरातील जुना मोंढा भागात जात अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समधील कार्यालयावर छापा टाकला. त्यानंतर हे पथक पुन्हा जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. बाजार समितीत या पथकाने काही कागदपत्रे तपासल्याची माहिती मिळत आहे. या पथकातील अधिकाऱ्यांची संख्या मात्र कळू शकली नाही.
- तीन ठिकाणी ईडीचे छापे -