जालना- मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज नाकारत असल्याच्या तक्रारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे आल्या होत्या. त्यावर बुधवारी भोकरदन येथे आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आढावा बैठक बोलविण्यात आली. यात उपस्थितीत लाभार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सर्व समस्यांवर मात करणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा तरुणांना कर्जास नकार... आर्थिक विकास महामंडळ काढणार तोडगा
महामंडळाचे लाभार्थी व बँकेच्या अधिकाऱ्यांची समोरासमोर बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. यावर सगळ्या अडचणींवर मात करून मराठा समाजाच्या ज्या तरुणांना उद्योजक व्हायचे आहे, त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी बैठकीत केले आहे.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील
महामंडळाचे लाभार्थी व बँकेच्या अधिकाऱ्यांची समोरासमोर बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. यावर सगळ्या अडचणींवर मात करून मराठा समाजाच्या ज्या तरुणांना उद्योजक व्हायचे आहे, त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी बैठकीत केले आहे. यावेळी भोकरदन तालुक्यातील मराठा समजाचे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा-रहमती पीरच्या तिसऱ्या उरुसासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी
Last Updated : Jan 30, 2020, 10:43 AM IST