महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी पळवला; शिपायासही जीवे मारण्याची धमकी - jalna police

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुक्तीसाठी लॉकडाऊनचे आदेश दिलेले असून, अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर कोणालाही रस्त्यावर येण्याची परवानगी नसताना बदनापूर तालुक्यात वाळू माफीयांचा प्रचंड हैदोस सुरू आहे.

dumper sand confiscated by the administration was hijacked by sand robber
प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी पळवला; शिपायासही जीवे मारण्याची दिली धमकी

By

Published : Apr 21, 2020, 7:07 PM IST

बदनापूर (जालना) - लॉकडाऊन परिस्थितीतही तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असून, काल मांजरगाव येथे फुटलेल्या आणि पंक्चर अवस्थेत सापडलेला आणि 5 ब्रास वाळू असलेल्या डंपरचा पंचनामा करून महसूल प्रशासनाने सरपंचाच्या ताब्यात दिलेला होता. हा जेसीबी अज्ञान लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने उचलून नेला असून, थांबवण्यास गेलेल्या ग्रामपंचायत शिपायास जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी पळवला; शिपायासही जीवे मारण्याची दिली धमकी

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुक्तीसाठी लॉकडाऊनचे आदेश दिलेले असून, अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर कोणालाही रस्त्यावर येण्याची परवानगी नसताना बदनापूर तालुक्यात वाळू माफियांचा प्रचंड हैदोस सुरू आहे. सोमवारी मांजरगाव शिवारात (एमएच 21, बीएच 4289) डंपर नदी पात्रात समोरील काचा फुटलेला आणि टायर पंक्चर अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे या डंपरला बॅटरीही नव्हती. याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला. त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला आणि मालक अर्जुन दगडू पालोदे (रा. टाकळी हिवर्डी, ता. भोकरदन) याच्या विरोधात बदनापुरात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हायवा डंपरची दोन्ही चाके पंक्चर असल्यामुळे महसूल प्रशासनाने सदरील हायवा मांजरगाव येथील सरपंच लिंबाजी आरसूळ आणि ग्रामपंचायत शिपाई लहू रामराव वाघ यांच्या ताब्यात देऊन रितसर ताबा पावती महसूल प्रशासनाने घेतली होती. मात्र, पंचनामा करून गुन्हा नोंद होण्याची कारवाई बदनापूर पोलीस ठाण्यात झाल्यानंतरही 20 एप्रिल रोजी 20 ते 25 जणांच्या टोळक्याने सदरील हायवा जेसीबीला लावून पळवला. ही बाब ग्रामपंचायत शिपाई लहू रामराव वाघ यांना लक्षात येताच त्यांनी या लोकांना अडवून सदरील जेसीबी महसूल प्रशासनाने ग्रामपंचायतच्या ताब्यात दिलेला असून, पोलीस कारवाईसाठी जप्त केलेला आहे. असे सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही सदरील टोळक्याने वाघ यांना न जुमानता हायवा जेसीबीला लावून जालनाकडे नेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे वाघ यांनी नेण्यास विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

शिपाई सरपंच यांच्याकडे आले. तोपर्यंत ते अज्ञात टोळके सदरील हायवा जेसीबीने ओढत जालना रोडने घेऊन गेले. या बाबत सरपंच लिंबाजी आरसूळ व शिपाई लहू वाघ यांनी बदेनापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली असून, तहसीलदार यांनाही या बाबत कळविले आहे. वाळू माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला असून, जमावबंदी असताना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने थेट गावात येऊन प्रशासनाच्या ताब्यातील हायवा पळवल्यामुळे सामान्य नागरिकांत उलट सुलट चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details