महाराष्ट्र

maharashtra

भारतीय जैन संघटनेच्या डॉक्टर्स आपल्या दारी उपक्रमात ५०० रुग्णांची तपासणी

By

Published : Apr 27, 2020, 1:07 PM IST

Updated : Apr 27, 2020, 3:25 PM IST

भोकरदन पोलीस कॉलोनी मध्ये २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर वाडी येथे ८७ ,गोकुळ १०१ , जळगाव सपकाळ १३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

doctors-came-at-your-home-helps-to-rural-patients
भारतीय जैन संघटना च्या डॉक्टर्स आपल्या दारी उपक्रमात ५०० रुग्णांची तपासणी

भोकरदन(जालना)- जगात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना फ़ोर्स मोटर्स फिरता दवाखाना घेऊन आरोग्य तपासणीसाठी सरसावाली आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या प्रेरनेने राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गर्दर्शनाखाली भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथे १४० रुग्णांची तपासणी पार पडली.

मयूर बाकलीवाल, तालुका अध्यक्ष

फत्तेपूर येथील गांवकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चांगला प्रतिसाद दिला. पोलीस या महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. म्हणून भोकरदन पोलीस कॉलोनीमध्ये २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर वाडी येथे ८७ ,गोकुळ १०१ ,जळगांव सपकाळ १३४ रुग्णाची तपासणी करण्यात आली.

भारतीय जैन संघटनेच्या डॉक्टर्स आले आपल्या दारी उपक्रमात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ५ दिवसात तालुक्यात जास्तीत जास्त रुग्ण तपासणी होईल, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल यांनी केले. याउपक्रमात डॉ. आकाश पांडे, डॉ.हर्षल महाजन, डॉ.नाथजोगी, नारायण पाटील चौबे,शारदा पैठनकर आदींची सहभागी आहेत

Last Updated : Apr 27, 2020, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details