महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धामणा धरण.. सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

आज हे धरण 85 टक्के भरले आहे. सांडव्याला पडलेल्या छिद्रांमुळे धरणातील पाणीसाठा कमी होईल, मात्र वाहत जाणाऱ्या या पाण्यापासून धरणाला कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे अफवांवर विश्वस ठेवू नये, धरण सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

धामणा धरण.

By

Published : Jul 3, 2019, 4:45 PM IST

Updated : Jul 3, 2019, 6:42 PM IST

जालना- जाफराबाद तालुक्‍यात 1972 मध्ये धामणा मध्यम प्रकल्प पूर्ण झाला. तेव्हापासून आतापर्यंत या धरणाला असलेल्या सांडव्याच्या भिंतीमधून कधीही पाणी वाहिले नाही. मात्र मंगळवारपासून झालेल्या पावसामुळे तांगडा, शिवना, दहिगाव या भागातील पावसाचे पाणी या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आले असून तलाव 85 टक्के भरला आहे. त्यासोबत या सांडव्याला असलेल्या छिद्रांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे हे धरण फुटण्याची शक्यता असल्याच्या अफवा परिसरात पसरल्या असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धामणा मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अफवांवर विश्वास न ठेवता या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याविषयी या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. बी. जाधव यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता जाधव धरणाची पाहणी करण्यासाठी प्रकल्पावर गेल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या माहितीच्याआधारे या विभागाचे उप अभियंता गोल्डये यांनी या विषयी माहिती दिली.

गोल्डये म्हणाले की, या धरणाची क्षमता 10.72 दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये 2.21 घनमीटर मृतसाठा असून या धरणामध्ये आजच्या तारखेपर्यंत 9.97 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे आज हे धरण 85 टक्के भरले आहे. सांडव्याला पडलेल्या छिद्रांमुळे धरणातील पाणीसाठा कमी होईल, मात्र वाहत जाणाऱ्या या पाण्यापासून धरणाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अफवांवर विश्वस ठेवू नये, धरण सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिवरे घरण दुर्घटना -

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ११ मृतदेह हाती लागले आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Last Updated : Jul 3, 2019, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details