भोकरदन - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील आरोग्य विभागाचे डाॅक्टर्स, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी "कोरोना फायटर्स" म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांना आज पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले.
भोकरदनमध्ये वैद्यकीय अधिकारी, पोलिसांना पीपीई किटचे वाटप - jalna corona update
50 पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किटचे वाटप आज भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
भोकरदन
या सर्वांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या एकूण 50 पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किटचे वाटप आज भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष गोरड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोतीपवळे तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.