महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rajesh Tope on corona new variant : नव्या व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना डिस्चार्ज - आरोग्य मंत्री राजेश टोपे - कोरोना व्हेरिएंट पुणे राजेश टोपे माहिती

पुण्यात BA- 4 आणि BA- 5 व्हेरिएंटचे 7 रुग्ण ( BA 4 variant patient Pune ) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी ( corona new variant patient discharge pune ) देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on corona new variant ) यांनी दिली.

Rajesh Tope on corona new variant BA 4
कोरोना व्हेरिएंट पुणे राजेश टोपे माहिती

By

Published : May 29, 2022, 12:58 PM IST

Updated : May 29, 2022, 2:25 PM IST

जालना -पुण्यात BA- 4 आणि BA- 5 व्हेरिएंटचे 7 रुग्ण ( BA 4 variant patient Pune ) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. काही रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आले असून काही दक्षिण भारतातून आल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच, या दोन्ही व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी ( corona new variant patient discharge pune ) देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on corona new variant ) यांनी दिली.

माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा -Pakistan Street Jalna : चक्क परतुरमध्ये 'पाकिस्तान गल्ली'; भाजपा आमदारांनी केला निषेध

या सातपैकी अनेक रुग्णांनी दोन्हीही डोस घेतले असून त्यामुळेच त्यांना कोणताही त्रास झाला नाही. दोन्ही व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचे टोपे यांनी जालन्यात म्हटले. अलीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरिकांची चाचणी घेण्याचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.

ज्या नागरिकांचे दोन डोस झालेले नाही त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, तसेच बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन देखील टोपे यांनी केले. सध्या राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी मास्क बंधनकारक करणे गरजेचे नाही असेही टोपे यांनी सांगितले. या व्हेरिएंटच्या अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले.

हेही वाचा -Kidnap : जालना चार कोटींच्या खंडणीसाठी दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

Last Updated : May 29, 2022, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details