महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपत्ती व्यवस्थापनात जीवित अन् वित्तहानी बचावाचे धडे - जालना बातमी

अपघातामध्ये जखमी झालेला रुग्णावर तातडीची उपाययोजना म्हणून काय करता येईल. यासंदर्भात प्रत्यक्ष कृतीकरून दाखविण्यात आली.

disaster-management-training-in-jalna
disaster-management-training-in-jalna

By

Published : Jan 22, 2020, 9:23 PM IST

जालना- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आज आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणदेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

आपत्ती व्यवस्थापनात जीवित अन् वित्तहानी बचावाचे धडे

या प्रशिक्षणाला निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, प्रशांत पडघन, दीपक काजळकर, याहया पठाण, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासन आणि सिंचन विभागाचे कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा-पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघे आले परत, तिसऱ्याचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

प्रशिक्षणानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. त्यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णावर तातडीची उपाययोजना म्हणून काय करता येईल. यासंदर्भात प्रत्यक्ष कृतीकरून दाखविण्यात आली. त्याच सोबत एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर ती कशा पद्धतीने नियंत्रणात आणता येईल. जल आपत्तीच्या वेळी विहिरीत पडलेल्या किंवा अन्य संकटात सापडलेल्या व्यक्तींना दोरखंडाच्या साह्याने कसे बाहेर काढता, येईल याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनात लागणाऱ्या साहित्याचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी देखील याचा फायदा घेतला. हे प्रशिक्षण देण्यासाठी चिंतामण कदम दिलीप कांबळे अशोक पवार हे आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details