जालना - भोकरदन रस्त्यावर गुंडेवाडी शिवारात गट क्रमांक ७६ मध्ये राजलक्ष्मी ग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून जास्त नफा कमविण्यासाठी बनावट खत निर्मिती होत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून या कारखान्याचे सुमारे ६३ लाख किमतीचे बोगस खत पकडले. याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात कृषी विभागाच्या नियंत्रकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : कृषी विभागाचा छाप्यात ६३ लाखांचे बनावट खते जप्त; पोलिसांत गुन्हा दाखल - sales
एकूणच शेतकऱ्यांना फसविण्याचा हा प्रकार असल्याचेही कृषी विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे रात्री उशिरा कृषी विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालनापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टिलायझर्स गोदामावर छापा टाकला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सायपा दगडू गरडे हे शुक्रवारी ३ मे ला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तपासणी करून नमुने घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी आर शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी सुखदेवे यांना घेऊन गेले. सिंगल फास्फेट तयार करणाऱ्या या कंपनीतील युनिटची पाहणी करत असताना त्यांना या कंपनीच्या परिसरातच पश्चिम बाजूला एक पत्र्याचे शेड दिसले. या शेडमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली असता संशयित खताचे उत्पादन होत असल्याचे लक्षात आले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कंपनीतील पदाधिकारी मुंदडा यांना या उत्पादनाच्या कायदेशीर बाबी विषयी विचारणा केली. असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तसेच इथे उत्पादित होत असलेल्या उत्पादनाविषयी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर बॅगवर निम अमृत, निमऑर्गानिक, जहाजे छाप, धरमजी मोरारजी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, तसेच नीम कि शक्ती, नीम ऑर्गानिक पॉवर,असेछपाई केल्याचे निदर्शनास आले. या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या कच्चामाल ठेवण्याचेही दिसून आले.
काय संगतो कायदा
या कंपनीने हे खत असा उल्लेख करून प्रत्यक्षात मात्र खत नसणारे उत्पादन उत्पादित करून खत नियंत्रण आदेशाचे पालन न करता सदर खताचे बॅग वर चुकीची छपाई करून खत असल्याचा दावा केला आहे. आणि शेतकऱ्यांचा विश्वास घात करून फसवणूक केली आहे. खत नियंत्रण आदेश १९८५ कलमांचाही भंग केला आहे. प्रक्रिया न केलेल्या वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या स्त्रोतापासून सेंद्रिय खत बनविले पाहिजे परंतु तसे न करता त्यात टाकाऊ पदार्थांचा वापर करून एखादा पदार्थ होत नसतानाही खत म्हणून खोटे पासून संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी त्याची विक्री केली. त्यामुळे या कंपनीचे मालक संचालक जबाबदार व्यक्ती ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.