भोकरदन (जालना) -भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतामधील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळी ६ वाजता बँकेसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. पीक कर्ज घेण्यासाठी विलंब होत आहे. त्यात भरलेला अर्ज त्रुटीमध्ये बाहेर काढला जात आहे. काही शेतकऱ्यांना ६ दिवसापासून चकरा मारूनही पीक कर्जासाठी नंबर लागत नाही. त्यामुळे सकाळी ५ ते ६ वाजताच आपली हातातील शेताची कामे सोडून बँकेसमोर नंबरची वाट पाहत तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही नंबर नाही लागला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर लावण्यासाठी यावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पीक कर्जासाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज
कोरडवाहू (दुष्काळी) परिसरातील शेतीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांच्या कौटुंबिक खर्चालाच पुरत नाही. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी होणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे पेरणीसाठी बी-बियाणे, खते, औषधे व मशागत यावरील खर्चासाठी पीक कर्ज घ्यावे लागते.
पैशांचा अभाव, त्यात दुबार पेरणीचे संकट