जालना -आशिया युथ इंटरनॅशनल मोडेल ऑफ युनायटेड नेशन (एआयआय एम यूएन)च्या परिषदेसाठी परतूर तालुक्यातील दीपक अंभोरे यांची निवड झाली आहे. मात्र, परदेशी जाण्यासाठी लागणारा खर्च, याची जमवाजमव करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.
आशिया युथ इंटरनॅशनल मोडेल परिषदेसाठी निवड झालेल्या दिपक अंभोरेची मदतीसाठी धडपड - asia-youth-international-conference-
त्याने आशिया युथ इंटरनॅशनल मोडेल ऑफ युनायटेड नेशन या परिषदेसाठी अर्ज केला. पोलीस प्रशासनाच्या संदर्भात त्याला निबंध सादर करण्यासाठी तेथे निमंत्रित केले आहे.परदेशात जाण्या-येण्यासाठी पैसे नसल्यामुळे दीपक मदतीचे आवाहन करत राजकीय नेते, आणि सरकार दरबारी चकरा मारत आहे.
एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या दीपक अंभोरे याचे वडील शेतकरी आहेत. जेमतेम तीन एकर शेतीवर दीपकसह दीपकचे आई वडील आणि त्याचा लहान भाऊ यांचा कसाबसा खर्च भागवला जातो. मात्र, शिकण्याच्या जिद्दीमुळे दिपकने औरंगाबाद येथे राहुल पत्रकारिता क्षेत्रात पदवी मिळवली. हे करत असतानाच त्याने आशिया युथ इंटरनॅशनल मोडेल ऑफ युनायटेड नेशन या परिषदेसाठी अर्ज केला. पोलीस प्रशासनाच्या संदर्भात त्याला निबंध सादर करण्यासाठी तेथे निमंत्रीत केले आहे.
दिनांक 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान ही परिषद मलेशिया देशात पुत्राजया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे होणार आहे. 94 देशातून अडीच हजार युवा प्रतिनिधी येथे सहभागी होणार आहेत .परदेशात जाण्या-येण्यासाठी पैसे नसल्यामुळे दीपक मदतीचे आवाहन करत राजकीय नेते, आणि सरकार दरबारी चकरा मारत आहे. 80 हजार रुपये खर्च त्याला अपेक्षित आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी किंवा शासनाने त्याला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.