जालना -आल्याची आवक अचानक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. याचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
आल्याचे दर गडाडले
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे आल्याचे पीक चांगले आले होते. त्यामुळे प्रति क्विंटल 9 ते 10 हजार भाव मिळाला. तसेच पावसामुळे पिकाचे वजन देखील चांगले भरत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला होता. मात्र यावर्षी उलट परिस्थिती आहे. अवेळी पावसामुळे पिकांची वाढ झाली नाही. तसेच जे काही थोडे फार पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले, ते देखील साठवण्यायोग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आले विकण्यासाठी बाजारात गर्दी केली. त्यामुळे आवक वाढल्याने आल्याचा दर घसरला.