जालना -एका चाळीस वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. या मृत्यूला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्य बजावणारे डॉक्टर आणि नर्स जबाबदार असल्याचा ठपका ठेवून रुग्णांच्या नातेवाईकांनी पाच तास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा पाच तास ठिय्या - due to negligence of doctors
एका चाळीस वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्य बजावणारे डॉक्टर आणि नर्स जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी पाच तास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
आज सकाळी रुग्णाच्या मुहूर्ताची बातमी कळल्यानंतर नातेवाइकांनी कोविड रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांची समजूत काढण्यासाठी सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांना बोलावण्यात आले. आणि नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही रुग्णांचे नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे हे रुग्ण पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात गेले, आणि आपली कैफियत मांडली .
'चौकशी करून कारवाई करू'
सामान्य रुग्णालयात भरती झालेला रुग्णाचा स्कोर 21 होता. त्यामुळे जेव्हा हे भरती झाले त्याच वेळेस परिस्थिती गंभीर होती. आणि अशा परिस्थितीत हे रुग्ण सुविधा नसलेला रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याने ती अधिकच खालावली. नियमानुसार सामान्य रुग्णालयात भरती झाल्यावर त्यांना सर्वतोपरी उपचार केले आहेत. मात्र तरीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आपण या प्रकरणात कुठे दिरंगाई झाली का याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.