जालना - बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका शेतात 30 वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दावलवाडी शिवारात शिवप्रसाद चेचाणी यांच्या शेतातील गट नंबर 203 मधील विहिरीत 24 मे रोजी एका 30 वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत तरंगताना दिसून आले.
बदनापूरमध्ये अनोळखी व्यक्तीचा विहिरीत आढळला मृतदेह - death of a stranger
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका शेतात 30 वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

विहिरीत अनोळखी मृतदेह
घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच श्रीमती खरात, मनोज निकम यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असून, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.