महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू - जालना गुन्हे बातमी

आलापूरमध्ये निहादच्या नातेवाईकाचे लग्न होते. लग्न समारंभ झाल्यानंतर निहाद 2 मित्रांसोबत केळना नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो नदी पात्रात बुडाला.

पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू

By

Published : Nov 11, 2019, 8:48 PM IST

जालना- भोकरदन जवळील आलापूर येथील केळना नदीमध्ये पोहायला गेलेल्या नऊ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेख निहाद शेख रफिक असे नदी पात्रात बुडलेल्या मुलाचे नाव आहे.

शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू

हेही वाचा -मंठा पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ यांत्रिक एसीबीच्या जाळ्यात

आलापूरमध्ये निहादच्या नातेवाईकाचे लग्न होते. लग्न समारंभ झाल्यानंतर निहाद 2 मित्रांसोबत केळना नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो नदी पात्रात बुडाला. सोबतच्या 2 मित्रांनी आरडा-ओरड केल्याने जवळच असलेल्या नागरिकांनी धाव घेवून नदीपात्रामध्ये उड्या टाकून निहादचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकास कळविले. अग्निशमन पथकाने घटनास्थळी दाखल होवून शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर निहादला शोधण्यात यश आले.

हेही वाचा - जालना पोलीस शांतता अन् सलोख्यासाठी सज्ज

निहादला तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी निहाद मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, निहाद हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details