महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रोनच्या साहाय्याने वाळूचे मोजमाप; एक कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त - driver

जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळूचा अवैध साठा जप्त केला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ९० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा अवैध वाळू साठा खूप लांबपर्यंत विखुरलेल्या अवस्थेत असल्याने ड्रोनच्या सहाय्याने त्याचे मोजमाप करण्यात आले.

ड्रोनच्या साहाय्याने वाळूचे मोजमाप

By

Published : Jun 25, 2019, 11:02 PM IST

जालना - अंबड तालुक्यातील मौजे कुरण आणि पाथरवाला येथील गोदावरीच्या काठावर सुरू असलेल्या वाळू उपसाच्या ठिकाण आणि वाळू साठवलेल्या ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज धाड टाकली. हा वाळूचा साठी सुमारे २ किलोमीटरपर्यंत लांब दिसत होते. त्यामुळे याचे मोजमाप करणे कठीण होते. म्हणून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने याचे मोजमाप केले. त्यावेळी सोळाशे पन्नास ब्रास वाळूचा अवैध साठा असल्याचे निष्पन्न झाले. बाजारामध्ये या वाळूची सुमारे ५० लाख रुपये किंमत आहे.

यासोबत अन्य अवैध वाळू साठे यांची माहिती घेत असताना मंगरूळ गावामध्ये श्रीराम मठाच्या बाजूला गोदापात्रामध्ये पोकलेनच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा करून टिप्परमध्ये भरत असताना आरोपी आढळून आले. दोन पोकलेन ७० लाख रुपये ३ टिप्पर (क्रमांक एमएच २० डिजी १७६७), चालक संदीप महादु घुले (रा. नांजी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद), एम एच २० ईजी ४१२८ चालक, कलीम रमजान शेख (रा. गंगापूर जि. औरंगाबाद) आणि एमएच २० सिटी ३८७० चालक बाळासाहेब भीमराव राठोड (रा. वरखेड तालुका अंबड) असे एक कोटी ४० लाख रुपयांचे टिप्पर जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणाहून एक कोटी ८९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, संदीप सावळे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.आजची ही कामगिरी पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, पोलीस कर्मचारी गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, तसेच महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details