जालना -दाभाडी ते सोमठाणा फाटा हा जुना डांबरी रस्ता खोदून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धुळ उडत असून ही धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाणी फवारणी करावी जेणेकरून धूळ उडणार नाही, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
रस्त्यावरची धूळ पिकांवर साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान - पिकांवर धुळ साचल्याने नूकसान बदनापूर
तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत राजूर ते पैठण या मार्गाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत दाभाडी ते सोमठाणा या रस्त्याचेदेखील नूतनीकरण करण्यात येत आहे. समृध्दी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे त्या कामासाठी मुरुम वाहणारे ट्रकदेखील याच रस्त्यावरून जातात. वाहनांमुळे रस्त्याने प्रचंड धूळ उडते. ही धूळ पिकांवर साचल्याने पिकांची वाढ खुंटत आहे.
रस्त्यावरची धुळ पीकांवर साचल्याने नूकसान
हेही वाचा -कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना