जालना Curfew In Jalna District : जालन्याचे नवीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (Superintendent of Police Shailesh Balkawade) आंतरवली सराटी या उपोषणस्थळी गावात जाणार आहेत. त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिलीयं. बलकवडे यांनी आज जालन्याचे पोलीस अधिक्षक म्हणून चार्ज घेतलाय. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. त्यामुळं नवीन एसपी यांनी चार्ज घेतला असून सर्वसामान्य माणूस म्हणून मी काम करतो, असं बलकवडे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मी आंतरवली सराटी या गावात जाणार असून आंदोलक मनोज जरांगे यांना भेटणार आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेले मतभेद दूर करणार आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न :सध्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. तसेच 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती, 7 सप्टेंबर रोजी गोपाळकाला, 14 सप्टेंबर रोजी पोळा सण व 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या सण, उत्सवांच्या अनुषंगाने मिरवणुका व इतर कार्यक्रम होणार आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्टया सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसंच मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने रास्तारोको, या प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रमांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अपर जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 31 (1) व (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे निर्देश जारी केले (Demonstration in Jalna) आहेत.
राज्याची सुरक्षितता महत्त्वाची :शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रं, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू आणि इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील, अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशानं असभ्य भाषण करणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही. सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. (Shailesh Balkawade will meet maratha protesters)