जालना - कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि मृतांचा आकडा लक्षात घेता नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळेच कोरोना चाचणी तपासणी करून घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक सात संभाजी नगर भागात असलेल्या तीनही नगरसेवकांच्या माध्यमातून या प्रभागांमध्ये नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
जालन्यात कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने रांगा
जालना शहरातील प्रभाग क्रमांक सात संभाजी नगर भागात असलेल्या तीनही नगरसेवकांच्या माध्यमातून या प्रभागांमध्ये नागरिकांची तपासणी केली जात आहे.
मागील आठवड्यात या प्रभागांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रभागात असलेल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये जिल्हा प्रशासनाची शोध घेणारी टीम जाऊन ते स्वॅब घेतात. आज पहाटेपासूनच या शाळेमध्ये स्वॅब देण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
भगवान चाटसे यांनी नागरिकांचे स्वॅब घेतले. यापूर्वी शनिवारीदेखील अशाच पद्धतीने 50 नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. सोमवारी देखील सुमारे 100 नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. या पथकात आरोग्य विभागाचे भगवान चाटसे आणि अमोल सपकाळ हे कार्यरत आहेत.